विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीचा इतिहास अनेक महत्त्वपूर्ण बाबींनी भरलेला आहे. राजा भीमदेव यांच्या कारकीर्दीत नावारूपास आलेल्या भिमडी या शहराचे नाव पुढे भिवंडी झाले. भिवंडीची भौगोलिक रचना व्यापारीदृष्टय़ा आदर्श अशी आहे. जलमार्ग आणि भूमार्गाच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शहरात पुढे वस्त्रोद्योग नावारूपाला आला.